आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चितरंजनपूर आंगणवाडीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर!

▪️सेविका रजेवर, शिपाई 12 वाजता आंगणवाडी उघडी टाकून फरार, सरपंच सूरज एस. मॉडल व सरपंच सोनी डी. मॉडल यांचा प्रशासनाला इशारा..!

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : चितरंजनपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील चितरंजनपूर येथील आंगणवाडी क्रमांक 1 मधील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला असून संताप व्यक्त केला जात आहे.

या आंगणवाडीच्या सेविका मॅडम रजेवर आहेत. असे असताना आंगणवाडी बंद ठेवणे अपेक्षित होते, मात्र येथील शिपायाने दुपारी ठीक 12:00 वाजता आंगणवाडीचे कुलूप उघडले आणि आंगणवाडी तशीच उघड्या अवस्थेत टाकून तो पसार झाला. तासन्तास आंगणवाडी लावारिस पडून होती.

हा धक्कादायक प्रकार गावचे कर्तव्यदक्ष सरपंच सूरज एस. मॉडल आणि सरपंच सोनी डी. मॉडल यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या संपूर्ण हलगर्जीपणाचा व्हिडिओ पुरावा म्हणून शूट केला असून, त्यावेळी माजी पोलीस पाटील देखील उपस्थित होते.

आंगणवाडीमध्ये लहान मुलांचा पोषण आहार, खेळणी, औषधे व इतर महत्त्वाचे साहित्य ठेवलेले असते. आंगणवाडी उघडी असल्याने हे साहित्य चोरीला गेले असते तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

या गंभीर प्रकरणी तक्रारदार म्हणून सरपंच सूरज एस. मॉडल, सरपंच सोनी डी. मॉडल, माजी पोलीस पाटील आणि चितरंजनपूर येथील सर्व पालक वर्ग यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार करत मागणी केली आहे की, संबंधित लापरवाह शिपाई आणि सेविका मॅडम यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण चितरंजनपूर गावाचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.