आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️देवी विसर्जन मिरवणुकीत ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे मालक व आयोजकांवर धडक कारवाई..

▪️८५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन मूल पोलीसांची कामगिरी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

मुल – दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस स्टेशन मूल हद्दीत दिनांक २१/१०/२०२६ रोजी पोलीस अधिकारी व अंमलदारांमार्फत विशेष गस्त व तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. गस्त दरम्यान मूल शहरातील गांधी चौक परिसरात ‘दरार दुर्गा मंडळ’ विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या डीजे वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी काही डीजे वाहनांवरील ध्वनिक्षेपकांचा (साऊंड सिस्टीम) आवाज विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलीस पथकाने ध्वनीमापक यंत्राद्वारे (Sound Level Meter) केलेल्या मोजणीत निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित डीजे चालक व मंडळाच्या आयोजकांना ध्वनीची तीव्रता कमी करण्याबाबत तत्काळ स्पष्ट सूचना दिल्या. मात्र, संबंधितांनी पोलिसांच्या कायदेशीर सूचना व आदेशांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला.

कारवाई करण्यात आलेल्या इसमांची नावेः

१. संतोष प्रभाकर ठाकूरवार, वय ५१ वर्षे, रा. मूल (अध्यक्ष, दरार दुर्गा मंडळ)

२. अनिकेत रवी ननावरे, वय २२ वर्षे (डीजे मालक व चालक)

३. अभिषेक चंद्रशेखर चिट्टलोजवार, वय २२ वर्षे, रा. मूल (डीजे मालक व चालक)

४. धीरज जुगलकिशोर घिचरे, वय ५१ वर्षे, रा. मानेवाडा, नागपूर (डीजे धुमाळ मालक व चालक)

५. लकी अनिल दुर्गे, वय १९ वर्षे, रा. बोरचांदली, ता. मूल (डीजे मालक व चालक)

गुन्ह्याची नोंद व जप्त मुद्देमालः

सदर इसमांनी डीजेच्या आवाजाची विहित मर्यादा ओलांडून तसेच पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्याने त्यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक ७३२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३८, १३६ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून डीजे साहित्यासह एकूण ५ वाहने, असा एकूण रु. ८५,२१,०००/- (अक्षरीः पंच्यांशी लाख एकवीस हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.