अखंड हिंदुस्तानासाठी संस्थानांचे विलीनीकरण करून सरदार पटेलांनी विभाजन रोखले. – ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर
उरुळी कांचन : स्वातंत्र्योत्तर भारताचे 565 हुन अधिक लहान मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात यशस्वी विलीनीकरण करून सरदार पटेलानी एकसंध हिंदुस्तान ठेवण्याचे महान कार्य केले. जुनागड, हैदराबाद, काश्मीर सारख्या कठीण संस्थानांचे विलीनकर करून देशाचे विभाजन रोखले. अखंड हिंदुस्तानासाठी सरदारांनी संस्थानांचे विलीनीकरण करून विभाजन रोखले म्हणून ते अखंड भारताचे शिल्पकार ठरले, असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक, डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केल. उरुळी कांचन येथे राष्ट्रीय एकता रॅलीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम विजयमाला पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अधिकारी तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशन व ग्रामस्थ उरुळी कांचन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या रॅलीमध्ये प्रामुख्याने व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे, राष्ट्रप्रेम निर्माण होणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणे हा ह्या रॅलीचा प्रमुख उद्देश होता.यावेळी स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.या याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वरील मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन येथे राष्ट्रीय एकता रॅलीचे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने केवडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी परेट आयोजित करण्यात आलेले आहे. यासाठी अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा ,पांडिचेरी येथील पोलीस अधिकारी , अंमलदार यांच्या वतीने अखंड भारत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता रॅली उरुळी कांचन येथे आली असता उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार तसेच पोलीस अधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी रॅलीतील अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले केले. या कार्यक्रमाला शिवाजीराव कांचन, सुनील जगताप पत्रकार दैनिक सकाळ सुरेश कांचन, माजी मुख्याध्यापक,
बाळकृष्ण काकडे, संतोष कांचन ,मयूर कांचन, सुनील तुपे पत्रकार, सुरेश वाडेकर पत्रकार, अमोल भोसले दैनिक केसरी पत्रकार, सुवर्णा कांचन, बापुराव चौधरी महाराष्ट्राची भूमी,महंत गोपाळदास कपाटे ,निखिल कांचन ,शंकर झरड पत्रकार,किरण भंडारी, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी विद्यार्थी, शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.



