आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांच्या थकीत रक्कम सात दिवसांत द्या..

▪️आठव्या दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन करणार इसारा..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

घुग्घुस, – आज दिनांक 27 आक्टोंबर 2026 रोजी नगर परिषद घुग्घुस, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, पोलीस निरीक्षक घुग्घुस ला आजाद समाज पार्टी विदर्भ सचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, जिल्हा महासचिव सौ. रिताताई फकरु देशकर व घुग्घुस येथील 32 आशा वर्कर स्वयंसेविकांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. की,

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या घुग्घुस येथील ३२ आशा वर्कर / स्वयंसेविकांच्या प्रलंबित प्रोत्साहनपर रकमेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित स्वयंसेविकांच्या म्हणण्यानुसार व दिनांक 14 सप्टेंबर, 2020, संदर्भ
1.शासन निर्णय नगर निगम विकास विभाग क्र. टीएफसी – 8015/प्र. क्र. 106/नवि-04,
दिनांक 03 आगस्ट, 2015

2.शासन निर्णय नगर निगम विकास विभाग क्र. टीएफसी – 8015/प्र. क्र. 106/नवि-04,
दिनांक 28 मार्च 2020

शासनाच्या निर्णयानुसार , कोविड काळात त्यांना २४ महिन्यांसाठी दरमहा ₹१,००० प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन महिन्यांची रक्कम मिळाली असून उर्वरित २२ महिन्यांच्या रकमेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दिनांक 12 आक्टोंबर 2026 रोजी मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती परंतु आज पंधरा दिवस ओलांडून सुध्दा नगर परिषद घुग्घुस कडुन कुठलही उत्तर मिळालेले नाही. म्हणून आज दिनांक 27 आक्टोंबर 2026 रोजी अंतिम निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक सेवा पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रोत्साहनपर रकमेबाबत स्पष्टता नसणे ही चिंतेची बाब असून संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रश्नावर सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी, आणि सौ. रिताताई फकरु देशकर, जिल्हा महासचिव, आजाद समाज पार्टी, चंद्रपूर, यांनी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व संबंधित आरोग्य विभागाकडे अंतिम निवेदन देण्यात आले आहे.

सात दिवसांची अंतिम मुदत

या निवेदनाद्वारे घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविकांच्या कोविड काळातील प्रोत्साहनपर रकमेची चौकशी करावी, केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित निर्णयांनुसार प्रत्येक स्वयंसेविकेला किती रक्कम देय होती याचा लेखी तपशील द्यावा, मंजूर निधी व प्रत्यक्ष वितरित रकमेचा हिशोब उपलब्ध करून द्यावा आणि पात्र स्वयंसेविकांना नियमानुसार देय असलेली संपूर्ण थकीत रक्कम निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत अदा करावी, अशा प्रमुख मागण्या या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत.

तसेच रक्कम प्रलंबित राहण्याची कारणे, संबंधित कार्यालयाची कार्यवाही आणि पुढील निर्णय याबाबत लेखी खुलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आठव्या दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन

निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करून पात्र स्वयंसेविकांची देय थकीत रक्कम अदा न झाल्यास, आठव्या दिवसापासून घुग्घुस येथील आठवडी बाजार रंगमंचावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

आंदोलन लोकशाही मार्गाने व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून करण्यात येईल. प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता संबंधित अभिलेखांची तपासणी करून पात्र स्वयंसेविकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“आशा स्वयंसेविकांनी कठीण काळात जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण सेवा दिली. त्यांच्या प्रोत्साहनपर रकमेबाबत पारदर्शकता असली पाहिजे. शासन निर्णयानुसार जेवढी रक्कम देय आहे, ती तातडीने मिळाली पाहिजे. सात दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल,” अशी भूमिका सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव सौ. रिताताई फकरु देशकर व घुग्घुस येथील 32 आशा वर्कर स्वयंसेविकांनी मांडली.

“आमची मागणी न्यायाची आहे, कृपा करण्याची नाही!”
निवेदन सादर करताना
– सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव — विदर्भ सचिव, आजाद समाज पार्टी.
– सौ. रिताताई फकरु देशकर — जिल्हा महासचिव, आजाद समाज पार्टी, चंद्रपूर.
– घुग्घुस येथील ३२ आशा स्वयंसेविका.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.