ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पत्रकारांनी समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करावे – आ.प्रतिभाताई धानोरकर

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

मुल – ( इंडिया 24 न्यूज ) : पत्रकारांनी समाजासाठी चांगले काम करीत असताना समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले
यावेळी बोलताना आ. प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा चौकीदार आहे. संघटनात्मक बांधणी करताना पत्रकारांनी अतिशय दक्ष असले पाहिजे. नेतृत्व आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. व्हाईस ऑफ मीडिया आपल्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करीत राहो अशी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. पत्रकारांनी जमिनीवर राहून काम करावे. त्यांनी आपले ध्येय आकाशासारखं उंच ठेवले पाहिजे. संघटना हेच आपलं कुटुंब आहे. या संघटनेमध्ये काम करीत असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मी तुमच्या सोबत राहीनं अशा पद्धतीचा एक आशावाद प्रतिभाताई धानोरकर यांनी व्हाईस ऑफ मिडीया ला दिला. संघटनेना उच्च शिखर गाठो अशीही शुभेच्छा त्यांनी यावेळी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.