ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माध्यमांनी गुलामगिरीची सवय आता मोडून काढली पाहिजे – संजय आवटे

▪️मूल येथे व्हाईस आफ मिडीया तर्फे पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा..

 

संपादक – शिल्पा बनपूरकर

मूल : ( इंडिया 24 न्यूज ) – माध्यमांनी गुलामगिरीची सवय आता मोडून काढली पाहिजे. त्यासाठी रविष कुमार यांना पत्रकारांचे आयकॉन म्हणून ओळखले पाहिजे. अभिव्यक्तीची गळचेपी होणार नाही याविषयी सगळ्यांनी दक्ष असणे गरजेचे असल्याचे मत व्हाईस आफ मीडीयाचे राष्टीय कार्याध्यक्ष संजय आवटे यांनी व्यक्त केले . मूल येथे दि. 2 आक्टोबर रोजी आयोजित एक दिवशीय पत्रकारांची कार्यशाळा व मान्यवरांचा गौरव सोहळा या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी तर्फे मूल येथे विदर्भ विभागीय पदाधिकारी तथा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा येथील स्वर्गीय मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आ. प्रतिभाताई धानोरकर या होत्या.त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे होते. विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विनोद दत्तात्रय, शेतकरी नेते रविकांत तुपकर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनूले, राज्य संघटक सुनील कुहिकर,आनंद आंबेकर,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे ,कार्यशाळेचे संयोजक गुरु गुरनूले, रोहिदास राऊत, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुडूमवार, प्रकाश कथले, विजय सिद्धावार,जितेंद्र जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी निधी जंबूलवार हिने गणेश वंदनपर नृत्य सादर केले.तसेच कला निकेतनच्या चमूने वैष्णव जन तो… हे भजन सादर केले. मान्यवरांचं कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आले.पुढे बोलताना संजय आवटे म्हणाले की, देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीय दंगली घडवण्याचे काम सुरू आहे.समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. अशावेळी पत्रकारांनी आपली ठोकपणे भूमिका निभावली पाहिजे. पत्रकारांनी वास्तविकता सांगावी. जातीय सलोखा आणि सोहार्द टिकवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केलं पाहिजे. आजच्या जगामध्ये खरी पत्रकारिता करण्याचं खरे आव्हान उभे राहिलं आहे. पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज निर्माण केला पाहिजे. त्यांचा विश्वास त्यांनी कायम ठेवला पाहिजे. सकारात्मक पत्रकारिता माध्यमकर्मीणी केली पाहिजे. बदलणारे जग माध्यमांना कळलं पाहिजे, अशी रोखठोक भूमिका संजय आवटे यांनी मांडली. लोकशाही धोक्यात येते तेव्हा पत्रकारांचा कस लागतो असेही संजय आवटे पुढे म्हणाले.
व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप काळे यावेळी बोलताना म्हणाले की, पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. सकारात्मक पत्रिकारितेमध्ये खूप मोठी ताकद असते. आपल्या कार्यामध्ये सर्वांनी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी त्यांनी मूल येथील जिलेबी विकणाऱ्या एका हरियाणातील माणसाचे उदाहरण त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे एक कृतीशील कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. देणेकरी म्हणून आपण काय काय देऊ शकतो, या विचारांसाठी बारामती येथे एक अधिवेशन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.केंद्राकडे आपण पत्रकार महामंडळ स्थापन करावे अशा पद्धतीची मागणी करण्यात आल्याचे संदीप काळे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी 200 कोटी रुपये मिळावे अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. तळमळीने काम करून व्हाईस ऑफ मीडिया चा झेंडा देशात सगळीकडे फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं एक आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जो प्रामाणिक पणे काम करतो त्याला निश्चितच यश मिळते, असाही विश्वास संदीप काळे यांनी बोलून दाखविला. त्यांनी यावेळी रविकांत तुपकर यांची राष्ट्रीय संचालक म्हणून नियुक्ती केली. आजपासून ते पूर्णवेळ काम करतील असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना सुनील कुहिकर म्हणाले, लेखणीची ताकद समाज हितासाठी वापरणे गरजेचे आहे. कारण पत्रकारांमध्ये समाज परिवर्तनाचे काम आहे. पत्रकारितेचा उपयोग समाज हितासाठी केला पाहिजे असे सुनील कुहिकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे यांनी केले.यावेळी विनोद दत्तात्रय, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांनी आपले मनोगत सादर केले. उद्घाटन सत्राचे संचालन प्राध्यापिका राज्यश्री मार्कंडेवार यांनी केले. तर आभार नासिर हासमी यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.