आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️हत्तीचा मृत्यू झाल्याचे कळताच वन विभागाची तारांबळ

 

धनराज सरपाते – सिंदेवाहि तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही – (इंडीया 24 न्यूज ) : चंद्रपूर मधील सिंदेवाही तालुक्यामध्ये, ओडीसा राज्यातून छत्तीसगड महाराष्ट्रात दाखल झालेल्या ,नर हतीचा मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील चिटकी परिसरात झाला. सविस्तर वृत्त असे की, ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोली च्या जंगल मार्ग वैनगंगा नदी ओलांडून, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी, नंतर सावली नागभीड तालुक्यात झाला. मागिल एक महीन्यापासून सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात होता . मागील पंधरा दिवसांपुर्वी सिंदेवाही तालुक्यातून सावली तालुक्यातील जंगल परीसरात गेला होता. अचानक दोन तिन दिवसापूर्वी सिंदेवाही वनपरिक्षेत्र (प्रादे)उपक्षेत्र सिंदेवाही नियतक्षेत्र लोनखैरी येथील चिटकी या गावाचे जंगलात नर या हत्तीचें आगमन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .


या अगोदर सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या गावात मागील २३दिवसांपुर्वी हत्तीने शेतशिवारात थैमान घातले होते. कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
रात्रीच्या सुमारास जंगललगत असलेल्या 20 शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले होते . त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. तसेच हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांब सुद्धा पाडला होता. दिनांक २/१०/२०२३ रोजी चिटकी मुरपार येथील जंगलात हत्तीचे आगमन झाल्याचे लोकांनी सांगितले दिनांक ३/१०/२०२३रोजीअचानक नर हतीचा मृत्यू झाल्याचे कळताच वनविभागात एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी, पोलीस निरीक्षक सिंदेवाही, कनिष्ठ अभियंता विद्युत महामंडळ सिंदेवाही, हे शेतकरी श्री अशोक बोरकर चिटकी यांचे अतिक्रमणीत शेतामध्ये वरील सर्व अधिकारी आपले सहकारी यांचेसह घटनास्थळी दाखल झाले.व मृत हत्तीचे शवाची पाहणी केली. आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये सभोवताल फिरून तपास केला.लगेच शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर खोब्रागडे चंद्रपूर व यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन शवविच्छेदन केले.हत्ती कशामुळे मृत झाला हे स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास वन विभाग व पोलीस विभाग करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.