आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️”सूर्योदय युवा प्रतिष्ठान” च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाकरीता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

▪️समाजसेवक सत्यवान गायकवाड यांच्या कार्याचं सर्वस्तरातून कौतुक..

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

वाशी :(इंडिया 24 न्यूज )दि.24 ऑक्टोंबर नवी मुंबई तसेच, महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी निस्वार्थ भावनेतून सामाजिक कार्य करणारे समाजसेवक सत्यवान गायकवाड यांच्या माध्यमातून “सूर्योदय युवा प्रतिष्ठान” ची स्थापना करण्यात आली असून, दसरा – विजयादशमीचं औचित्य साधून “सूर्योदय युवा प्रतिष्ठान” चा पहिलाच सामाजिक उपक्रम नवी मुंबईतील कोपरी गाव येथे वास्तव्यास असणाऱ्या तृतीयपंथी समाजाकरीता घेण्यात आला.

समाजसेवक सत्यवान गायकवाड यांच्या संकल्पनेतून तृतीयपंथीयांकरीता मोफत हेल्थ चेकअप त्यासोबत, अन्नधान्य वाटप तसेच, नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेक अप असा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवून संस्थेचा पहिला उपक्रम यशस्वीपणे राबविला.
तृतीयपंथीयांच्या मोफत हेल्थ चेकअप उपक्रमा अंतर्गत, ६० तृतीयपंथीच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

यामध्ये रक्तदाब, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले त्यासोबतच, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचे देखील हेल्थ चेक अप करण्यात आले.
यावेळी, न स्वीकारणाऱ्या समाजातून जेव्हा सहकार्याच्या आणि आपलेपणाच्या भावनेने आमच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्थेला आणि समाजसेवक सत्यवान गायकवाड यांच्या पुढील वाटचालीस उपस्थित सर्व तृतीयपंथीयांनी आशिर्वाद दिले.

तृतीयपंथी समाजाच्या माध्यमातून संस्थेच्या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली असून, यापुढेही सामाजिक, शैक्षणिक, तसेच, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी “सूर्योदय युवा प्रतिष्ठान” च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार असल्याचं सांगत
महाराष्ट्र राज्यात विविध शहरात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करून महाराष्ट्र राज्यभर कार्य करण्याचा मानस समाजसेवक सत्यवान गायकवाड यांनी व्यक्त केला.
तर, सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी 8356850963 या क्रमांकावर संपर्क साधून संस्थेत सहभागी व्हावे. असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.