ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे : दिनांक 5 डिसेंबर, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2023-2024 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी, बाजरी व रागी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी रविवार, 31 डिसेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी,बाजरी व रागी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही श्री.सोनवणे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.