आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आशांनी आयुर्वेदाचे प्रचारक व्हावे – नगराध्यक्ष देवतारे

 

इंडिया 24 न्यूज़
उप संपादक
एस एस खाॅजा
8484858982

वर्धा:-ग्रामीण भागात व मागास वस्त्यात आशा स्वयंसेविका आरोग्यदूताचे कार्य करीत असतात. आशा सेविकांनी दैनंदिन कामासोबतच आयुर्वेदाच्या प्रचाराला हातभार लावल्यास मोठ्या प्रमाणात गावोगावी आयुर्वेदाचा प्रसार होईल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांनी दीपचंद विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित सर्वरोग निदान व आयुर्वेदिक उपचार महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित म हात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयाद्वारे आयोजित या शिबिराच्या उद्घाटन समारोहात परिसरातील सुमारे ७५ आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. पराडकर यांनी यावेळी ‘हर घर दस्तक’ या शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमाची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी संस्थेतील विविध आरोग्य योजनांची माहिती दिली. तसेच, कोरोनाकाळातील आशा स्वयंसेविकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा त्यांनी गौरव केला. यावेळी नगरसेवक शैलेंद्र दफ्तरी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. नखाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेवतकर, सेलू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नवीन चौधरी, हरीश पारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबीर संयोजक तथा रोगनिदान विभाग प्रमुख डॉ. अरुण वानखेडे यांनी केले. संचालन डॉ. प्रेमकुमार बडवाईक यांनी केले व आभार डॉ. सुमंत पांडे यांनी मानले.या शिबिरात आयुर्वेदिक उपचारांसोबतच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील सेंटर ऑफ एक्सलन्स आरोग्य सेतू उपक्रमांतर्गत स्तनाच्या व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाबाबत तपासणी करण्यात आली. शिबिरात तीनशेहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शिबिरस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनीतील आयुर्वेदिक वनस्पतींची ओळख, त्यांचे गुणधर्म आणि उपयोगितेबाबत नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.