ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत होत आहे विद्यार्त्यांच शोषण ?

▪️पुस्तकांऐवजी विद्यार्थ्यांच्या हातात देत आहे झाडू :- आप चे सुरज शहा..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर

दिनांक 5 जानेवरी 2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शिष्टमंडळ भद्रावती तालुक्यातील मांगली येथील जिल्हा परिषद शाळेत पाहणी करण्याकरिता गेले. त्या दरम्यान दिसून आलं की चक्क विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देण्याऐवजी त्यांच्या हातात झाडू दिसले. विद्यार्थी झाडू हातात घेऊन वर्गखोलीत झाडू मारत होते. आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष सुरज शहा यांना ही कृत्य लक्षात येतात तिथल्या शिक्षकांना विचारले की, शाळेत विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणासाठी बोलवता की झाडू माराण्या साठी ? “6 व्या वर्गातल्या एका मुलाला वचारला की तुम्हाला इंग्लिश वाचता येते काय ? मुलगा म्हणाला की मला इंग्लिश वाचता येत नाही” दिल्लीमध्ये जिथे सरकारी शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग पूल ची सुविधा आहे दर्जेदार शिक्षणाची सुविधा आहे दर्जेदार वर्ग खोल्यांची सुविधा आहे महाराष्ट्र सरकार तर ते सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना देऊ नाही शकणार, पण तुम्ही तरी विद्यार्थ्यांचं शोषण नाही केलं पाहिजेत. यानंतर आम्हाला विद्यार्थ्यांच्या हातात फक्त पुस्तके दिसले पाहिजेत, झाडू मारताना दिसले किंवा कोणत्याही प्रकारचे शोषण होत दिसेल तर आम्ही तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत करणार अशी चेतावणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी संबंधित शिक्षकांना देण्यात आले आहे. यावेळीआम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर मीडिया प्रभारी आमीर शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.