ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भद्रावती तालुका बनला आहे भ्रष्टाचारांचे माहेरघर.

▪️पिर्ली गावातील अवघ्या सहा महिन्यात बांधकाम झाले भुमिसपाट :- आप उपाध्यक्ष सुमित हस्तक

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : तालुक्यात पिर्ली या गावातील शमशान भूमीला ग्रामपंचायत पिर्ली अंतर्गत संरक्षण भिंतीचे काम सहा महिन्या अगोदर करण्यात आले. पिर्ली गावातल्या गावकऱ्यांनी या संदर्भात तक्रार आम आदमी पार्टी भद्रावती यांना दिली, गावात शमशान भूमीच्या संरक्षण भिंतीचे काम सहा महिन्या अगोदर पूर्ण झाले आणि अवघ्या सहा महिन्यातच ते काम भूमी सपाट झाले आहे. त्या कामाची सविस्तर पाहणी जेव्हा आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व मीडिया प्रभारी आमीर शेख मार्फत करण्यात आले, तेव्हा दिसले की संपूर्ण काम हे भूमी सपाट झालेला आहे. संरक्षण भिंतीच्या संपूर्ण कामात भ्रष्टाचार झालेला आहे संरक्षण भिंतीच्या कामात निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे. चार लाखांच्या कामाला 1 लाख लावून निष्कृष्ट दर्जाचे काम करून बाकीचा पैसा गबन करण्यात आला आहे असा आरोप आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी केला आहे.

सदर विषयाची तक्रार उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद वरोरा यांना शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी दिली आहे व या विषयांवर सकोल चौकशी करून ग्रामपंचायत पिर्ली चे सरपंच, ग्रामसेवक, मेंबर, ठेकेदारावर व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावे असा इशारा दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.