ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️12 जानेवारी ला जिजाऊ जयंती उत्सव व कार्य गौरव समारंभाचे आयोजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : स्थानिक धाबेकर नगर खडकी बु अकोला येथे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने दिनांक 12 जानेवारी 2024 ला दुपारी चार वाजता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये मराठाभूषण पुरस्कार मराठा योद्धा गजानन हरणे, गजाननराव पथरीकर तेल्हारा व जिजाऊ पुरस्कार नम्रता धर्माळे मलकापूर,

दिव्या पाथरीकर टाकळी अकोट, श्रीलेखा पाटील परतवाडा यांना वितरित केला जाणार आहे. तसेच ह भ प वासुदेवराव महाराज महल्ले यांचा नागरि सत्कार सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटक शिवश्री प्रा. दादाराव पाथरीकर हे राहणार असून विशेष उपस्थिती व पुरस्कार वितरन ह भ प वासुदेव महाराज महल्ले, व ह भ प शंकरदादा बोर्डे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण होणार आहे .

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विदर्भ प्रदेशअध्यक्ष राजेश घोगरे, विदर्भ संघटक अजय शेळके, नारायणराव बारड, विदर्भ सचिव विनायकराव धोरण, विभागीय अध्यक्ष सुरज अंधारे, जिल्हाध्यक्ष वैभव चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष योगिता शेळके, प्रसिद्धीप्रमुख देवानंद गहिले, महानगर अध्यक्ष भूषण महल्ले, विदर्भ प्रसिद्ध प्रमुख सुधाकर चौधरी, विदर्भ संघटक अरुण गावंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी शिवश्री जिल्हा प्रवक्ता संतोष देशमुख यांचे जिजाऊ चे विचार काळाची गरज ! या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा सेवा संघा अकोला विभागाद्वारे प्रसिद्धी पत्रका द्वारे प्रमोद धर्माळे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.