ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : जीवन गौरव विशेष शिक्षक पुरस्कार आनंदवन येथील आनंद अंध विद्यालयातील कलाशिक्षक तथा दिव्यांग कल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्थाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परमानंद तिराणिक यांना डाँ.नंदकुमार राऊत महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शब्दशिल्प कविता संग्रह, शिक्षक संघटनेचे विशेषांक व पुष्पगुच्छ देवून सहपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी दहा शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखा चंद्रपूर येथील माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार सभागृहात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात विशेष म्हणजे व्यवस्थेतील महत्त्वपुर्ण पण दुर्लक्षित घटन असणाऱ्या अंगणवाडी सेवीका, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी, विशेष दिव्यांग शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेले स्ययंसेवक या कर्तुत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. परमानंद तिराणिक यांनी ‘घरोघरी संविधान’ वाचन उपक्रम हा एक लाख पोस्टकार्डवर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पोस्टकार्डच्या माध्यमातून पोहचविण्याचा एक आगळा – वेगळा उपक्रम केल्यामुळे ते या पुरस्कारात पात्र ठरले आहे. असा नामोउल्लेख करून त्यांची सहचरीणी रूक्मिणी तिराणिक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, डाँ. नंदकुमार राऊत महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव, नियोजन विभाग मंत्रालय मुंबई, श्रीमती अनिता ठाकरे उपशिक्षणाधिकारी, जि.प. चंद्रपुर, श्री. समाधान भसारकर,गटशिक्षणाधिकारी , रविंद्र कुमार अंबूले प्रशासन अधिकारी, शिक्षक सहकार संघटनाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जुमडे, महिला राज्याध्यक्ष शुभांगी चौधरी, तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.