ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️खडकी अकोला येथे मराठा आरक्षणाचा फटाके फोडून ,पेढे वाटून मिरवणुकी द्वारे जल्लोष..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : स्थानिक खडकी परिसरामध्ये मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश आल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने व सकल मराठा समाजाच्या वतीने खडकी परिसरात रॅली काढून पेढे वाटण्यात आले तसेच चौका चौकामध्ये फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अभा मराठा सेवा संघ संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व एकमेकाला पेळे भरवत गेल्या कित्येक वर्षापासून मराठा आरक्षण प्रलंबित होता तो प्रश्न मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषण आंदोलनाची दखम घेऊन शासनाने सोडवल्याबद्दल शासनाचे धन्यवाद आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी अकोला जिल्ह्यामध्ये मनोज पाटील जरांगे व मराठा आरक्षणाचा मुद्दा विदर्भ मध्ये रेटून धरणारे व सहा दिवस आमरण उपोषण करणारे ज्येष्ठ समाजसेवक मराठा योद्धा गजानन हरणे यांचे कार्याचे कौतुक करून पेढे भरून व सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथ्रीकर, विदर्भ संघटक राजेश घोगरे, अजय शेळके, मराठा योद्धा गजानन हरणे, सुरज अंधारे,नंदकिशोर गावंडे, संकेत काळे, प्रमोद धर्माळे, बाळू पाटील ढोले, डॉ.कृष्णकांत वक्ते, योगिता शेळके आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने बिर्ला गेट येथे.

सुद्धा समाजसेविका कमलजीत कौर युवा समाजसेवक केलविल सुबी यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात येऊन मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल ढोल ताशे वाजवून फटाके फोडून व पेढे वाटून सर्व मराठा समाजातील पदाधिकारी यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी या ठिकाणी अकोला शहरातून निघालेल्या विजय रॅलीचा समारोप करण्यात आला. चहापान नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.