ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शासन व प्रशासकीय लढा तर देऊच, न्यायलयीन लढ्या साठी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे आव्हान..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर

मुंबई – दि ( इंडिया 24 न्यूज ) शासन व प्रशासकीय लढा तर सुरूच आहे पण नोटीसीला उत्तर देऊन मी हॉटेल टुरिस्ट प्रकरणी न्यायालयीन लढ्यास हॉटेल मालक व चालक यांना आव्हान दिले असल्याची मत पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केले आहे.

पवई येथील अल्पवईन मुलींच्या शारीरिक उपभोगाचे केंद्र बनलेले व अनधिकृत बांधकाम करून अवैद्य धंदे चालवणारे हॉटेल टुरिस्ट वर अद्यापही बृहन्मुंबई महापालिकेने बुलडोजर चालवले नसून व अल्पवईन मुलींच्या वासनाकांडा बद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, याबद्दल समाजसेवक डॉ. माकणीकर यांनी दुःख व्यक्त केल आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हणाले की, हॉटेल टुरिस्ट च्या अवैद्य बांधकाम व वासनाकांडा बाबत माझ्याकडे ठोस पुरावे असून या पुराव्याच्या आधारे भ्रष्ट पोलीस प्रशासन व बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची दलालीगिरी समाजात मांडून न्यायपालिकेत नागडे करणार असून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

माझ्या तक्रारी कडे जाणीवपूर्वक काना डोळा करणारे प्रशासन पूर्णपणे हॉटेल कडून मॅनेज झाले असून अश्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्थरावरून चौकशी करावी यासाठी आमच्या संघटनेकडून व मित्रपक्षा च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

अल्पवईन मुलींची दलाली करून अय्याशी करणारा चालक रवी शेट्टी व सर्व काही माहिती असून मूग गिळून गप्प बसणारा मालक अशोक राय तसेच जाणीवपूर्वक कानाडोळा करून काही ठीकड्या घेऊन खिसे भरणारे भ्रष्ट प्रशासनाचे अधिकारी अश्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय मुख्यमंत्री सचिव डॉ. राजन माकनिकर यांनी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.