ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वरोड्यात 2 फरवरीपासून फन फेस्टचे आयोजन मूकबधिर विद्यार्थी करणार उद्घाटन..

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

वरोडा – ( इंडिया 24 न्यूज ) : : तभा वृतसेवा येथील कल्पतरू सोशल क्लब द्वारा २ फरवरी ते ७ फरवरीपर्यंत फन फेस्टचे आयोजन करण्यात आले असून या फन फेस्टचे उद्घाटन आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत कल्पतरू सोशल क्लब तर्फे देण्यात आली.

येथील बाबुलाल फूड प्लाझा येथे झालेल्या भरगच्च परिषदेत या फन फेस्टचे उद्घाटन २ फरवरीला सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दिल्ली येथील सुप्रसिद्ध १० फूट उंचीचे बाहुबली हनुमान जी यांची भव्य शोभायात्रा दुपारी ३ वाजता येथील गांधी चौकातून काढण्यात येणार आहे.
या क्लबतर्फे गेल्या तीन वर्षापासून या फन फेस्टचे आयोजन करण्यात येत असून १५०००० वर्ग फुटाच्या परिसरात या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

या फन फेस्टमध्ये दररोज प्रसिद्ध गायक आपल्या कला सादर करणार असून यासोबत लावणी नृत्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. याशिवाय विविध नामांकित चार चाकी व दुचाकी वाहनांचे स्टॉल व विशाल प्रदर्शनी सोबत विविध स्टाॅलमधील अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद प्रेक्षकांना घेण्यात येणार आहे. यासोबतच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी टोराटोरा, ड्रॅगन, चांदतारा, गगनचुंबी पाळणे या फन फेस्टचे आकर्षण राहणार आहे.
यावर्षी या फन फेस्टकरिता इयत्ता एक ते चार च्या विद्यार्थ्यांना मोफत पासेस वितरित करण्यात आले असून या दरम्यान शहरातील विविध मान्यवरांचा सत्कार कल्पतरू तर्फे करण्यात येणार आहे. या उत्सवाला दरवर्षी सुमारे एक लाखाच्या वर लोक भेट देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन कल्पतरू सोशल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला कल्पतरू सोशल क्लबचे अध्यक्ष चेतन शर्मा, प्रणय उर्फ सोनू मालू, राजू महाजन ,शशिकांत चौधरी, तरुण बैद, नचिकेत वानखडे, हौजपा अली यांचेही क्लबचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.