ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसील कार्यालय साक्री येथे तहसीलदार – साहेबराव सोनवणे यांना निवेदन देऊन, घंटा नाद आंदोलन करण्यात आले..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

साक्री – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या इडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या साक्री येथील कार्यकर्त्यांनी घंटानाद करून निषेध केला आहे.

आज राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका सर्वच घटक असून, या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. कापूस, सोयाबीन, कांदा, तुर या शेतमालाला भाव नाही, नोकर भरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपर फुटी ही नेहमीचीच झाली आहे, यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे, राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीत, पण महाराष्ट्राच्या वाटेने हक्काचे प्रकल्प इतर राज्यात आणि त्यातही प्रामुख्याने गुजरात मध्ये नेले जात आहेत.

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे, अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करूनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार ढुंकूनही बघत नाही. दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही. युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमधे त्याचप्रमाणे 60% आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने युवा वर्ग अस्वस्थ आहेत

आमदार रोहित दादा पवार यांनी पुणे ते नागपूर अशी आठशे किलोमीटर अधिक संघर्ष यात्रा काढून राज्यातील प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली अनेक प्रश्न शिल्लक आहेत पण सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाल करत नाही.

पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले आहेत तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहे त्यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र मराठे, किसान सभा जिल्हाध्यक्ष श्री सयाजीराव ठाकरे, जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक नरेंद्र तोरणे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रेखा अहिरे, साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष कविता बोरसे, किसान सभा तालुका अध्यक्ष कैलास भदाणे, किसान सभा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, लीगल सेल तालुकाध्यक्ष ॲड. सुनील नांद्रे, युवक तालुका अध्यक्ष कल्पेश सोनवणे, तालुका सरचिटणीस संदीप भामरे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष प्रदीप नांद्रे, पप्पू खैरनार, चेतन गांगुर्डे तसेच साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.