आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर

धुळे, दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्त) : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे माहिती घेण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी,कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याच्या वापर राज्यातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी 5 फेब्रुवारी,2024 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कुरबान तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी धुळे जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांचा लक्षांक जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधुन 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. पात्र अर्जांची छाणनी करुन जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समितीमार्फत सोडत काढुन शेतकऱ्यांची जेष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल.

▪️असे आहेत निकष..

अभ्यास दौऱ्यावर जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वतःच्या नावे ७/१२ व ८ अ असावा व उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी. तसे त्याने स्वयंघोषना पत्रात नमुद करावे. शेतकरी कुटुंबातुन फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल., शेतकरी किमान 12 वी पास असावा. त्याबाबत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे., शेतकऱ्याचे वय 25 पुर्ण व वर्ष ते 60 वर्षे पेक्षा जास्त नसावे. शेतकरी वैध पारपत्रक (पासपोर्ट) धारक असावा. शेतकरी, शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकिल, सी.ए, अभियंता, कंत्राटदार, इ. नसावा. तसे त्याने स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे.
अनुदानाचा तपशील शासनाकडुन अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लक्ष या पैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.तडवी यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.