आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️लाडबोरी येथेअवैध दारूचे धंदे जोमात

▪️ दारूबंदीसाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देताना महीला..!!

धनराज सरपाते: सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज) दिनांक २/२/२०२३ सिंदेवाही येथून जवळच असलेल्या लाडबोरी या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, यामध्ये नविन पिढीचे मुले व्यसनाचे आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत व त्याचा परिणाम कुटूंबातील लोकांवर होत असून ,शाळकरी मुलांवर सुद्धा होतो आहे .तसेच दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या लोकांकडून महीलांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

यासाठी लाडबोरी येथिल महीला दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका घेत, दारू पिऊन कुणाचेही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मा.तहसिलदार साहेब व मा. पोलीस निरीक्षक सिंदेवाही यांना भेटून, दारू विक्रीच्या विरोधात निवेदन दिले यावेळी श्रीमती मनीषा नागदेवते,सुगंधा नगराळे, अनिता नागदेवते,तानाबाई मालके,कुंदाताई कामडी, मंदाताई चौके,मायाताई तामगाडगे,लोमेशा डांगे,मंजूळाबाई उईके,भारती चहांदे व गावातील महिला उपस्थित होत्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.