ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️इरई बेटावर छत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारा – कुशाब कायरकर

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : हिंदवी स्वराज्याचे जनक,महाराष्ट्र व देशाचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच व भव्य पुतळा(स्टॅचू ऑफ युनिटी पेक्षाही भव्य)इरई नदीच्या बेटावर उभारण्याची मागणी इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई या पर्यावरण संस्थेचे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केली आहे व या करिता इरई बेटावरील जागा देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी जाणता राजा या महानांट्या
च्या उदघाटन प्रसंगी वने,सांस्कृतिक व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वरील घोषनेला मूर्त रूप देण्यासाठी कायरकर यांनी ही मागणी केली आहे.

इरई नदी चंद्रपूरकरांची जिवन दायनी असून नविन चंद्रपूर व चंद्रपूर महानगराच्या मध्यातून वाहते,दाताळा रस्त्यावरील इरई नदीवर रामसेतू पूल बांधण्यात आला आहे त्याच्या अगदी सामोर इरई नदी जिथं दोन भागात (पात्रात) विभाजीत होऊन वाहते त्याच्या अगदी मधोमध व भविष्यात बनणाऱ्या अमुजमेंट पार्क च्या लगत हे बेट असल्यामुळे इरई बेटावर उभारल्यास, अत्यंत मनमोहक ,सुंदर,भव्य प्रतिकृती मुळे जिल्ह्यातील पर्यंटनाला चालना मिळेल असा विश्वास कायरकर यांनी व्यक्त केला.
सन 1986,2006, 2013, 2022,2023 रोजी इरई नदी जी पूर्णतः बुजलेली असल्यामुळे महापुराचा फटका चंद्रपूरला बसला.पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 9 एप्रिल 2016 रोजी केलेली इरई पुनुरूजीवन व 24 डिसेंबर 2022 रोजी केलेली दाताळा पूल ते हडस्ती पर्यंत इरई खोलीकरणाच्या घोषनेला इरई नदीचे खोलीकरण करुन मूर्त रूप दिल तरच पुरमुक्त व इरईच्या स्वच्छ प्रवाहने छत्रपतींच्या पुतळ्याचे सौन्दर्य अभादीत राखता येईल अन्यथा अनेक सौंदर्यकर्णा प्रकारे हे स्थळ ही दुर्लक्षित होईल अशी भीतीही कायरकर यांनी व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.