ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मा.पंडितभाऊ दाभाडे यांना मुंबई येथे राज्यस्तरीय टी.एम.जी. अनमोल सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि टीएमजी क्रियेशन्स यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त पीएनजी महा गौरव सोहळा रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ भवन दुसरा मजला आझाद मैदान च्या बाजूला मुंबई महापालिका मार्ग सी एस टी एम मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक यांच्यासह अनेक क्षेत्रात उत्तुंग आणि निस्सीम सेवा कार्य अनुकरणीय व प्रेरणादायी ‌ उल्लेखनीय रचनात्मक अतुलनीय समाजभिमुख आणि चिकाटीने कार्य करण्याचा ठसा उमटविणारे पुणे येथील बहुजन हृदयसम्राट मा.पंडितभाऊ दाभाडे. संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल यांना ट्राॕफि.मेडल.आणि सन्मानपत्र देऊन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मा जयवंत वाडेकर यांच्या हस्ते या.पंडितभाऊ दाभाडे संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल यांचा सत्कार करून त्यांना राज्यस्तरीय टी एम जी अनमोल सामाजिक कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन एन डी खान (संस्थापक लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद) मा. डॉ. शैलेंद्र पवार (प्रमुख समन्वयक टि एम जी क्रियेशन्स) यांनी केले होते.

यावेळी देवेंद्र भुजबळ (महासंचालक माहिती विभाग म.रा) मा. सौ. सुनिता नाशिककर (मा. पोलीस उपअधीक्षक) मा. डॉ राजेश येवले (शिक्षण तज्ञ व बोर्ड ऑफ स्टडीज इंग्लिश) मा जाकीर खान (चित्रपट व टीव्ही हास्य अभिनेते) मा अंकुश वाढवे (चित्रपट व टीव्ही अभिनेते) मा अमृता उत्तरवार (चित्रपट अभिनेत्री) मा.मोहन बडगुजर (अध्यक्ष फाउंडेशन इंडिया व ज्येष्ठ समाजसेवक)मा. कुणाल भोईर (ज्येष्ठ उद्योगपती) मा. सिम्मी शेख(संचालिका रेड प्लेनेंट कंपनी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दर्शना माळी व कोमल डांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सलमा एन खान.(सहसंस्थापिका लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद) यांनी केले
यावेळी. डॉ.दिशा खान. विजय मोरे. सय्यद मुक्तार हाश्मी. विजय भोसले विलास देवळेकर यांच्यासह राज्यातील बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.