ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

घुग्घुसच्या आठवडी बाजारासाठी वाहनतळाची व्यवस्था करा आणि देशी दारूचे दुकान दर रविवारी बंद ठेवा

काँग्रेसच्या कार्याध्यक्षा दीप्ती सोनटक्के यांची मागणी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घुस :

औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस येथील आठवडी बाजारासाठी शासकीय वाहनतळाची सुविधाच नाही.

त्यामुळे नगर परिषदेतर्फे आठवडी बाजारासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमेटी घुग्घुसच्या महिला शहर कार्याध्यक्षा दीप्ती सोनटक्के तसेच जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगर परिषद कार्यालयात निवेदनातून मागणी केली आहे.

तसेच दर रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

घुग्घुस हे मोठया लोकवस्तीचे औद्योगिक शहर आहे. येथे दर रविवारी नगर परिषद कार्यालय ते एसीसी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत मोठा आठवडी बाजार भरतो. शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक तसेच घुग्घुस शहरातील नागरिक आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी साठी येथे येतात. तसेच अनेक खेड्यांतील नागरिक भाजीपाला विक्रीसाठी आपली दुकाने बाजारात लावतात त्यामुळे बाजारात गर्दी होते.

नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने बाजारात येतात परंतु येथे नगर परिषदेची वाहनतळासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने ते आपली वाहने एसीसी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावतात त्यामुळे ये-जा करण्यासाठी नागरिकांना नाहकत्रास सहन करावा लागतो अनेक वेळी वाहतूक विस्कळीत होते तसेच याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनतळ नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सकाळपासूनच रस्त्यावर वाहने उभी असतात आणि दुपारनंतर वाहनांच्या रांगा लागतात याच मार्गाने जडवाहन ये-जा करतात त्यामुळे यारस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच आठवडी बाजारालगत एक देशी दारूचे दुकान आहे. देशी दारूच्या दुकानात मद्यपी ये-जा करतात त्यामुळे आठवडी बाजारात येणाऱ्या महिलांना याचा मोठा त्रास होतो त्यामुळे दर रविवारी हे देशी दारूचे दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ,सुजाता सोनटक्के, पुनम कांबळे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.