ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धनगर समाजातील नवउद्योजक महिलांनी स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज सादर करावे..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

धुळे, दिनांक 5 फेब्रुवारी, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त केंद्रशासनाने भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील सवलतीस पात्र नवउद्योजक महिलांसाठी स्टॅड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारी, 2024 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडीया योजनेअंतर्गत धनगर समाजातील सवलतीस पात्र महिला नवउद्योजक शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या महिला नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देते. केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्याच्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या महिला नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देणे ही योजना सन 2023-2024 या आर्थिक वर्षांसाठी राबविण्यात येत आहे.

यात नवउद्योजक यांना 10 टक्के स्वत:चा हिस्सा भरणा केल्यानंतर व राष्ट्रीयकृत बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडीच्या अनुषंगाने प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल. स्टँड अप योजनेंर्गत जिल्ह्यातील सवलती घेण्यास पात्र असलेल्या भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजातील महिला नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज विहीत केलेल्या कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, धुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे येथे 15 फेब्रुवारी, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.