ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️खडकी, मलकापूर परिसरात शिवजयंती उत्सवात संपन्न..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) :
स्थानिक खडकी, मलकापूर परिसरामध्ये जिल्हा परिषद नगर, शिवाजी नगर, गुरुकुल कॉलनी, श्रीराम नगर , व्ही. एच .बी. कॉलनी,म्हाडा कॉलनी, अष्टविनायक नगर, आदी अनेक कॉलनामध्ये, परिसरामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्सवात , धुमधडाक्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. रोशनाई , रांगोळी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची रंगरंगोटी, फटाक्यांची आतिश बाजी, जनजागृती व्याख्यान ,मोटर सायकल रॅली आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक युवक मंडळांनी ,युवकांनी दिवसभर केले होते.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, नगरसेवक मंगेश काळे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर , विदर्भ अध्यक्ष राजेश घोगरे, विभागीय अध्यक्ष अजय शेळके, सुरज अंधारे,सामाजिक कार्यकर्ते शंकर लंगोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल हरणे, समाजसेविका कमलजीत कौर, युवा समाजसेवक केल्विन सुबी, शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद धर्माळे, निर्भय बनो जन आंदोलनाचे महानगर अध्यक्ष नंदकिशोर गावंडे, सुधाकर पोळकर , हरिभाऊ मालोकार, प्रा. चंतना देशमुख, विशाल टिकार, सुरज राऊत, तन्मय हरणे, एडवोकेट अमित राऊत, बाळू पाटील ढोले, आदि अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी मान्यवर तरुण युवक युवती महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा शिवजयंती उत्सव आनंदात उत्साहात व शांततेत खडकी मलकापूर परिसरात पार पडला. यावेळी आमरण उपोषण करते समाजसेवक गजानन हरणे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे, आदींच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राजमुद्रा ग्रुप, निर्भय बनो जण आंदोलन, अ. भा. मराठा सेवा संघ, स्थानिक तरुण मंडळांनी शिवप्रेमींनी अथग परिश्रम घेतले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.