ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

! आम्ही भारतीय लोक तालुका सिंदेवाही द्वारा आयोजित ! !!! जाहीर व्याख्यान !!!

!!! व्याख्याते: प्रा. श्याम मानव !!! * . मुख्य विषय: भारतीय लोकशाही पुढील आव्हाने * !! कार्यक्रमाला बहूसंखेने उपस्थित राहावे !! श्री स्वप्नीलभाऊ कावळे नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही

 

धनराज सरपाते: सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज ) दिनांक २६/२/२०२४
सिंदेवाही शहरात “आम्ही भारतीय लोक तालुका सिंदेवाही” द्वारा आयोजित कार्यक्रमामध्ये, व्याख्याते सन्मानिय प्रा. श्याम मानव , राजकीय विश्लेषक व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम, दिनांक २७/२/२०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोमेश्वर मंदिर देवस्थानचे भव्य पटांगणात ( फटाका ग्राउंड) सिंदेवाही येथे आयोजित केलेला आहे, कार्यक्रमामध्ये “भारतीय लोकशाही पुढील आव्हाने ” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले असून, यांमध्ये आज देशासमोर मोठी संकटे उभी आहेत? आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य किती अंधारात आहे? देशाची राजकीय स्थिती काय आहे? आपल्याला संविधान हवे की, दुसरे काही?या सर्व बाबींवर अभ्यास पूर्ण विवेचन होणार आहे,

तरी सदरील कार्यक्रमास बहूसंखेने उपस्थित राहण्याचे आवाहन “आम्ही भारतीय लोक तालुका सिंदेवाही ” यांचे वतीने श्रीमान स्वप्नीलभाऊ कावळे नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.