ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वेकोलीच्या कारगिल चौकात संतप्त नागरिकांचा तीन तास ठिय्या आंदोलन

मारहाणीत गंभीर घायाळ झालेल्या चालकाला उपचाराचा खर्च देण्याची मागणी ट्रान्सपोर्टर द्वारे मागणी मंजूर करताच आंदोलनाची सांगता

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : शहरातील वेकोलीच्या रेल्वे सायडिंगवर कोळसा भरण्याच्या वादात के.एस.टी.सी कंपनीच्या गणेश यादव या चालकास हाश्मी कंपनीच्या चालकाने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली यात गंभीरपणे घायाळ झालेल्या यादव याला मेहरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सदर चालकाला उपचाराला लागणारा संपूर्ण खर्च तसेच कुटुंबाला उदरनिर्वाह करिता लागणाऱ्या खर्चाची भरपाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,माजी सरपंच संतोष नूने,सामाजिक कार्यकर्ते उमेश गुप्ता,महिला काँग्रेस कार्यध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली वेकोलीच्या कारगिल चौकात सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत मारहाणग्रस्त चालकांच्या कुटुंबियांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले
यामुळे वेकोली परिसरात वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याने कोळशाची वाहतूक पूर्णता बंद पडली

आंदोलनाची माहिती कळताच वेकोली सब एरिया सुधाकर रेड्डी, सेफ्टी अधिकारी बल्लेवार,साईडिंग ईंचार्ज ठाकरे हे तातळीने आंदोलन ठिकाणी पोहचले तसेच घुग्घुस पोलीस आंदोलन स्थळी पोहचले आंदोलनाची दखल घेत वेकोली मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनी मध्यस्थी करीत दोन्ही कंपनीच्या ट्रान्सपोर्टर यांच्याशी चर्चा करून समस्या निकाली काढली कंपनीचे सुपरवायझर अनिल राम यांनी रुग्णालयाचा संपूर्ण खर्च उचल्याण्याचा आश्वासन दिले व हाश्मी कंपनीचे सुपरवायझर यांनी मासिक वेतन भरपाई देण्याचे मंजूर केले यानंतर सर्वसंमतीने आंदोलनाची सांगता करण्यात आली
याप्रसंगी रोशन दंतलवार सोशल मिडिया अध्यक्ष, विशाल मादर, राजकुमार वर्मा तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस,सुनील पाटील, मुन्ना शेख,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.