ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हाधिकारी कार्यालयावर झोपडपट्टीवासियांचा भव्य मोर्चा..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : अकोला विकास संघर्ष मंचच्या वतीने दिनांक ११ मार्च २०२४ रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील सर्व पात्र झोपड़पट्टी वासीयांना मालकी पट्टे प्रदान करावे या सह विविध मागण्यासाठी गांधी जवाहर बाग पासून मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चा मध्ये अकोला शहरातील महात्मा फुले नगर, आंबेडकर नगर, राजू गांधी नगर, कृषि नगर, लुम्बिनी नगर, जेतवन नगर, अकोट फैल, तारफैल, नायगाव, कमला नेहरू नगर, शिवसेना वसाहत, खदान इत्यादी झोपडपट्टीतील शकडो झोपडपट्टीवासिय सहभागी झाले होते. मोर्च्याचे नेतुत्व – ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, पंचफुला मोरे, साधना खिल्लारे, संजय राऊत, सुरेखा वाहने, उमा पंचाग, अनिता वानखडे, मिना सामसकर, मीना मेटे, j.p.मोरे, पुजा खंडारे, पंकज खंदारे, संतोष सावंत, अशोक सिरसाट, दुर्गा मोहीते, राधा संघेवार, उज्वला इगळे, पुष्णा इंगळे, पंकज काळे, कृष्णा घरडे, राहुल इंगळे, रत्ना भाकरे, गुलाब खैरे,प्रकाश सिरसाट, शंकर इंगोले. सुरेश लूले, दत्ता पाटील आदि सह शेकडा महिला पुरुष उपस्थित होते. मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व मनपाआयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये१) शासन निर्णया कमांक गवसु १२०१/प्र. क्र. ०९ झोपसु १, दि. १० जुलै, २००२ २) शासन निर्णया कमांक वगसु २०१६/प्र. क. ८६. झोपयु-२, दि १६ जुलै, २०१६ ३) शासन निर्णय कमांक: गवसु २०१६/प्र.क. ८६/ झोपनि-२ तारीख ०३ जानेवारी २०१७ ४) शासन निर्णय कमांक: एमयुएन-२०१८/प्र.क.१९७/नवि-१८ दि. १७ नोव्हेंबर, 2018 या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी व खालील मागण्या पूर्ण करणाऱ्या म्हणून*प्रमुख मागण्या* :
१) महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी झोपडपट्टी भाडेपट्टा धोरणांतर्गत शासनादेशानुसार अकोला शहरातील पात्र झोपडपट्टीधारकास त्यांच्या भोगवट्याखालील घराच्या जमिनीचा मालकी हक्काचा पंजिबध्द भाडेपट्ट्टा करुन द्यावा.२) अकोला शहरात १ जानेवारी २०११ पुर्वीची झोपडपट्टीधारकांनी निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे महाराष्ट्र शासन निर्णय (नगर विकास, क.एमयुएन-२०१८/प्र.क.१९७/नवि-१८, दि. १७ नोव्हेंबर २०१८) अनुसार नियमनाकुल
करण्यात यावी.३) प्रधानमंत्री आवास योजनेतील घटक ४ अंतर्गत झोपडपट्टीधारकास व्यक्तीगत पक्के घरकुल बांधता यावे म्हणुन शासनादेशानुसार रहिवाश्यास भाडेपट्ट्टा प्रदान करुन आवास योजनेचा लाभ मिळवुन द्यावा.४) अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना व इतर सरकारी आवास योजनेतुन झोपडपट्टीधारकांना घरकुलांसाठी अनुदान प्रदान करावे.५) शहरातील सरकारी, नझुल, महानगरपालिका व खाजगी जमिनीवरील झोपडपट्यांमध्ये सर्वेक्षण करुन रहिवाश्यांना भाडेपट्टंचे वाटप करावे.६) शहरात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (E.W.S) बेघर व गरीब नागरिकांसाठी सरकारी जमिनीवर घरकुलांची योजना राबविण्यात यावी.७) शहरातील सर्व झोपडपट्टी वसाहतीत मुलभूत नागरी सोयी-सुविधा नळ योजनेव्दारे शुध्द पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, गटार, शौच्छालय यादी सरकारी योजनेतुन उपलब्ध करुन द्याव्यात. अदि विविध मागण्यासाठी व शासन निर्णयाची स्थानिक पातळीवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष युवकांनी सहभाग घेऊन मोर्चा यशस्वी केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.