ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 शासकीय विद्या निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली संपन्न..

 

*🔹शिल्पा बनपूरकर*
*🔹संपादक*
*🔹मो.न.7030292628*

धुळे, दिनांक 19, मार्च, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे शहर विधानसभा मतदार संघ, अपर तहसिल कार्यालय, धुळे शहरमार्फत धुळे शासकीय विद्या निकेतन शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळे शहर मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी पल्लवी शिरसाठ, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सीमा अहिरे, मनपा उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मतदान जनजागृती रॅली शासकीय विद्यानिकेतन पासून महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका, आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा या मार्गावरुन काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयी विविध घोषणा दिल्यात. तसेच गांधी पुतळा चौकात मतदान जनजागृती विषयी पथनाट्य सादर केले.

स्वीप कार्यक्रमांतर्गत धुळे शहर विधानसभा मतदार संघ अपर तहसिल कार्यालय, धुळे शहर मार्फत मतदान जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येत आहे. विशेष करुन धुळे शहरात सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या भागात मतदानाची टक्केवारी कमी होती. अशा भागात विशेष लक्ष देवून मतदान जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येत आहे. येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे अप्पर तहसिलदार वैशाली हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.