ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सार्वजनिक ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निर्बंध : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 19 मार्च, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तींने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने, हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हादंडाधिकारी श्री. गोयल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये नमूद केल्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणुक प्रक्रिया पूर्णहोईपर्यंत निर्बंध घालीत असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.