आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स ( ईलना ) दिल्ली या देशभरातील प्रकाशक संपादकांच्या राष्ट्रीय संघटनेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोवा येथे संपन्न..

▪️प्रकाशजी पोहरेंसोबत केन्द्रीय कार्यकारिणीत माझ्या नियुक्तीने अकोल्याला दुसरी संधी‌..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळक

गोवा – ( इंडिया 24 न्यूज ) : येथे आरंबोलमधील ओजस्वी पॅराडाईज हॉटेलमध्ये ईलना अध्यक्ष मा.परेशनाथजी यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष या.प्रकाशजी पोहरे व व्दितीय उपाध्यक्ष राज्यसभा सदस्य मा.विवेकजी गुप्ता व निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजयजी बोंन्द्रीया यांचे प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व इतरांची फेरनियुक्ती झाली.या राष्ट्रीय कार्यकारिणीत माझी विश्वप्रभात संपादक व अनेक वर्षांपासून ईलना सभासद म्हणून(संजय देशमुख) नियुक्ती करण्यात आल्याने मा.प्रकाशभाऊ पोहरेसोंबत अकोल्याला माझ्या माध्यमातून हे पदाधिकारी दुसरं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे.

या सभेत वृत्तपत्रांच्या व निकरणासंबंधी चर्चा करण्यात आली.यावेळी नागपूरहून दैनिक राष्ट्रदुतचे व्यवस्थापकीय संपादक मा.शिव अग्रवाल,दैनिक राष्ट्रपत्रिकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक,मा.क्रिष्णाजी नागपाल भोपाळ येथील कृषीजगतचे संपादक मा.विजयजी बोंन्द्रीया,सातारा येथून दै.जिव्हाळाचे संपादक मा.बाळासाहेबजी आंबेकर,सुप्रसिध्द कवी,चारोळीकार मा. अनंतराव खेळकर,बंगळूरू,कर्नाटक येथील विर राणी चन्नाम्माच्या संपादिका सौ.सरोजीनी आर्गे,व अनेक राज्यांतील ईलना पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.