ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याग व समर्पण आवश्यक – ठाणेदार कैलाश भगत

▪️शहीद अभिवादन व समर्पण पुरस्कार वितरण..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपूरकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : आज जीवनमूल्ये कमी होत असून स्वार्थ वाढत आहे.माञ जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याग व समर्पण भावनेने कार्य करणे हेच देशासाठी शहीद झालेल्या हुतात्मा,जवान,किसान व ज्ञात-अज्ञात विरांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार कैलाश भगत यांनी केले. शहीद स्मृती दिनाच्या औचित्याने एकदिवसीय उपवास व जागर आयोजन करण्यात आले होते.

संत वासुदेव महाराज भूमिपुञ अभियान सभागृहात दर्यापूर रोड सिरसो येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.सकाळी जेष्ठ समाजसेवक गजानन हरणे अकोला यांच्या उपस्थितीमध्ये शहीद स्मृतीस वंदन करण्यात येवून वं.रा.तुकडोजी महाराज गुरूदेवसेवा मंडळाचे संचाने प्रेरणादायी देशभक्तीपर भजने सादर केलीत.

दुपारच्या सञात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलाश भगत यांच्या उपस्थितीमध्ये स्व.शंकरराव दौलतराव सोनखासकर स्मृती प्रतिष्ठान चे वतीने विदर्भ स्तरावरील समर्पण पुरस्कार पञकारीता क्षेत्र विलास मुलमुले यांना व सामाजिक सलोखा क्षेत्रांत अजहर अली नवाब यांना शाल,श्रीफळ व समर्पण पुरस्कारांनी गौरविण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत पोलीस पाटील राजेन्द्र भटकर,गुरूदेव सेवा मंडळाचे उत्तमराव पिंजरकर,आदर्श शिक्षक सुभाष मोहीते यांच्यासह सूरज देवीकर आट्यापाट्या व रोहीत पवार नेटबॉल या राष्ट्रीय खेळाडूंना सन्मानीत करण्यात आले.सामूहिक अभिवादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला सोनखासकर, प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, निर्भय बनो जन आंदोलनाचे महानगर अध्यक्ष नंदकिशोर गावंडे,बबनराव देशमुख, मुख्याध्यापक जयदीप सोनखास्कर, गोवर्धन पाथरे, सुरेशराव बाजड ऊर्फ सूरदास, रामभाऊ खडसे, निळकंठराव गि-हे, महादेवराव ढाकरे, नानाभाऊ मेहर, प्रेमनारायण कैथवास,शरद डवरे,तुळशीदास खोत,हेमंत कांबे,साहेबराव बांबल उपस्थित होते.प्रास्तविक गजानन हरणे यांनी संचलन व आभार प्रदर्शन आयोजक जयदीप सोनखासकर यांनी मानले.
कार्यक्रमसाठी शरद गणोरकर,रोहन शेळके,सुधाकर सातरोटे,शेख नूर,निखील बालप,संचीत ठोकळ,राजू कडू,सदानंद गचके,स्वप्नील हनवते,शेख नाजीम,रवी देवीकर,अरमान शेख यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.