ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चौकशी अधिका-यांचे पॅनेल करण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 27, मार्च, 2024 ( इंडिया 24 न्यूज ): महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार चौकशी / प्राधिकृत अधिकाऱ्यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

चौकशी/प्राधिकृत अधिकाऱ्यांची नामतालिका पॅनलसाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 70 वर्ष पुर्ण न झालेल्या), निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकौंटंट अर्ज करु शकतील. अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक यांच्या कार्यालयात तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांच्या कार्यालयात 31 मार्च, 2024 पर्यंत मिळतील. असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.