ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

!!अशी ही वाहतूक म्हणजे जानुनबुजून मरणाला आमंत्रण!!

!! पोलीस विभागाचे दुर्लक्ष !!

 

धनराज सरपाते:- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज ) दिनांक १२/४/२०२४
एकारा भुज मार्गे ते सिंदेवाही वन विभागाच्या काष्टभांडार आगार डेपोमध्ये ट्राक्टरच्या साह्याने, जळाऊ बिट व इमारती लाकूड वाहतूक करीत आहेत, या रस्त्यावर दहा ते बारा ट्राक्टर धावत असून काही ट्राक्टर व ट्राली जुनी आहेत, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दिवसात ठकाबाई तलावाजवळ १० मार्चला अशाच ट्राक्टरमुळे अपघात घडून दोन व्यक्ती मृत्यूमुखी पडले होते, अजूनही काही ट्राक्टरमध्ये इमारत लाकूड ओव्हरलोड करून वाहतूक करीत आहेत, काही काही ट्राक्टर सकाळी साडेपाच ते सात वाजताचे दरम्यान एका ट्राक्टरला दोन ट्राल्या लावून, दोन्ही ट्राल्यात बिट भरून वाहतूक करीत आहेत.

अशाप्रकारच्या दोन गाड्या चालू आहेत, अशी वाहतूक करणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे होय! पाथरी रोडवर जिटीसी जवळ व सिंदेवाही मधिल छत्रपती शिवाजी चौकात सिसिटिव्ही कॅमेरे लावलेली आहेत व तिथे पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुद्धा वाहतूक चालते म्हणजेच पोलीस विभागाचे दुर्लक्षच म्हणावे लागेल. व वनविभागाकडून वाहतूक परवान्यावर किती बिटाची चालान फाडतात हे एक प्रकारचे कोडंच आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.