ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत निर्भय बनो जन आंदोलन जनजागृती अभियान राबविणार!.. गजानन हरणे

 

संपादक – सौ. शिल्पा बांपुरकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : समाजकार्यात अग्रेसर असलेल्या निर्भय बनो जन आंदोलन व विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये दिनांक 15 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 पर्यंत जनजागृती अभियान राबवून मतदारांना स्वच्छ व चरित्र संपन्न उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन विविध कार्यक्रम राबवून करणार असल्याचे प्रतिपादन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन अकोला यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार जनजागृती करण्याकरता जनजागर, पोस्टर वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जनजागृती पत्रकाचे वाटप गावागावात, चौका चौकात केल्या जाणार आहे. कॉर्नर सभा, पथनाट्य द्वारे सुद्धा मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ग्रामीण भागात ग्रामसभा घेऊन मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी व स्वच्छ व चरित्र संपन्न उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अशाप्रकारे अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवून मतदारांना लोकशाहीच्या या पवित्र मंदिराला अपवित्र करणाऱ्या भ्रष्टाचारी, गुंड, दहशतवादी ,जातीवादी उमेदवाराला येथे पाठवू नये. नाही तर या पवित्र लोकशाहीच्या मंदिराची पावित्र संपून जाईल त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही अमिषाला बळी न पडता चारित्र्यशील उमेदवार कोणत्याही जातीपातीचा, पक्ष पार्टीचा न पाहता स्वच्छ चरित्रशील उमेदवारालाच मत देण्याचा आग्रह मतदान जनजागृती अभियानाद्वारे केला जाणार आहे. कारण जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार असून या निवडणुकीत आपले मत चांगला उमेदवाराला द्यावे नाही तर पाच वर्ष प्रस्तावण्याची पाळी येईल कारण आपण भाजीपाला घेताना चार ठिकाणी निरखून पाहतो, त्याचे भाव पाहतो, तो चांगला आहे की नाही हे निरखून पाहतो, तर यावेळी आपल्याला लोकसभेसाठी पाच वर्षासाठी उमेदवार निवडताना चार वेळ विचार करूनच मतदान केले पाहिजे .योग्य उमेदवार नसल्यास शासनाने दिलेल्या नकारात्मक (नोटा )मतदानाचा अधिकार बजावण्याचेही आव्हान या मतदान जनजागृती अभियानात नागरिकांना केले जाणार आहे. तरी या अभियानामध्ये मतदार संघातील नागरिकांनी ,सामाजिक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी करावे असे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.