ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गोंडपिपरीला दिलेला शब्द पाळला; काँग्रेसने काय दिले..? ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा खडा सवाल..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : ता. १३ : गोंडपिपरीच्या सभेत विकासनिधी आणण्याचा शब्द मी दिला होता. २३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी आणून मी शब्द पूर्ण केला, पण काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने काय केले?, असा खडा सवाल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मला लोकसभेत निवडून दिले तर गोंडपिपरीचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त करून आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी १९ एप्रिलला कमळाचं बटण दाबा आणि पुन्हा एकदा मोदी सरकार आणा, असे आवाहनही त्यांनी केले.

गोंडपिपरी येथे गुरुवार, 11 एप्रिल रोजी आयोजित सभेला ना. मुनगंटीवार संबोधित करत होते. यावेळी माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बबन निकोडे, अमर बोडलावार, चेतनसिंग गौर, मनिषा मडावी, मनिषा दुर्योधन, शारदा गरपल्लीवार, अश्विनी तोडासे, कोमल फरकाडे, सुरेखा श्रीकोंडावार व अॅड. अरुणा जांभुळकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी भाजपाचे युवा कार्यकर्ते स्व. प्रशांत येल्लेवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

गोंडपिपरी परिसराचा विकास करण्याची माझी तीव्र इच्छा असून हे कार्य तुमच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. 19 एप्रिलला मतदानाच्या दिवशी कमळ चिन्हाचे बटन दाबून जर तुम्ही मला निवडून दिले तर गोंडपिपरीतील अपूर्ण कामे पूर्ण करेन. तुम्ही मला जेवढे मतदान कराल त्याच्या कित्येक पट भरभरून विकास आपल्या वाट्याला येईल. जो देशाच्या बाजूने उभा राहिला त्याच्या बाजूने हा देश उभा राहील, अशी सादही ना. मुनगंटीवार यांनी घातली.

एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, स्टेडियम, सामाजिक सभागृह, नाट्यगृह, चिचडोह प्रकल्प अशा अनेक विकास कामांचा उल्लेख करताना ना. मुनगंटीवार म्हणाले, विश्वगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी सरकार येणे निश्चित असून मोदीजींचा विकासरथ गोंडपिपरीपर्यंत आणण्याचे मी वचन देतो. मोदीजींना साजेसा खासदार तुम्ही निवडून दिला तर महिला, बेरोजगार, बचत गटांचा लोकसभेत आवाज बुलंद करेन. संसदेला चंद्रपूरचे दरवाजे लावलेले असल्यामुळे ‘खुल जा सिमसिम’ असे म्हणताच आपल्यासाठी अर्ध्या रात्रीही हे दरवाजे खुले होतील तसेच राज्य आणि केंद्राच्या तिजोरीतील निधी देखील गोंडपिपरीच्या विकासासाठी आणता येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.