आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️चिमुर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत..!! ▪️महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांचे पारडे जड..!!

▪️भारतीय जनता पक्षाचे मतदार उपाशाला मोह गोड म्हणून मतदान केले तर चिखलातून कोकोंबा उमलेल यात शंका नाही..!!

▪️चिमुर – गडचिरोली लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत..!! ▪️महाविकास आघाडी नराज सरपाते सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही:( इंडिया २४ न्युज) दिनांक १५/४/२०२४
चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे ,महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस, इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ.नामदेव किरसान हे निवणुक जाहीर होण्यापूर्वी सन २०२३ पासूनच लोकसभा क्षेत्रात नाटकाचे उद्घाटन करणे, शंकर पटाचे उद्घाटन करणे, लग्न समारंभात तसेच कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावून लोकांसोबत भेटीगाठी घेऊन त्यांचेशी चर्चा करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वीच त्यांनी अवघे क्षेत्रच पिंजून काढले तसेच त्यांचे निवडणूक प्रचारार्थ, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते ना. मा. विजयभाऊ वडेट्टीवार हे लोकप्रिय उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत सभा घेऊन, काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते,युवक, महीला व शेतकरी वर्ग यांचेशी संवाद साधला,त्यामुळे ते लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत परीचीत झालेले आहेत, म्हणून मतदारांचा कौल त्यांचेकडे वाढून त्यांचे पारडे जड झालेले दिसते, तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मा.अशोक नेते यांच्या कार्यावर मतदार उदासीन आहेत, यापुर्वी मा. अशोक नेते हे दहा वर्षे या क्षेत्राचे खासदार राहून सुद्धा ते मतदाराचे अपरीचीत असल्यासारखे वाटते, त्यांनी आपले क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागातील एकही विकास कामे केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे त्यांच्याप्रती सहानुभूती राहिलेली नाही, खासदार कसा असावा याबाबत मतदारांमध्ये बरीच चर्चा करतात,मा. अशोक नेते हे जनतेसाठी भरीव असे काहीही कार्य केलेले नाही, त्यामुळे जी व्यक्ती खासदार असताना विकासकामे किंवा सामाजिक दृष्टीने कोणतेही जनकार्याची कामे केली नाहीत, त्यामुळे मतदार त्यांना नापसंती दर्शवताना दिसतात, पुन्हा उलटपक्षी अशीही चर्चा करताना दिसतात कि, बहुजन समाज पार्टी, बहूजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी,भिमसेना पार्टी,जनसेवा गोंडवाना पार्टी,अपक्ष उमेदवार, तसेच वंचित बहूजन आघाडी यांनी बहूमत घेतले तर काँग्रेसचे मतदान कमी होईल, आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार मा.अशोक नेते यांचेवर उदास जरी असले, तरी उपाशाला मोह गोड म्हणून जर मतदान केले तर
चिखलातुन कोकोंबा उमलेल यात शंका नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.