ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आमदार किशोर जोरगेवार यांचा एक फोन आणि महाकाली भक्तांसाठी खुलली मदरसेची दार..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : हिंदू मुस्लिम ऐकतेची अनेक उदाहरणे आजवर चंद्रपूर जिल्हाने दिली आहे. असेच एक आदर्श उदाहण पून्हा एकदा दिसुन आले असून आमदार किशोर जोरगेवार यांनी फोन करताच जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट चा दादमहल येथील शेरेतुल इस्लाम मदरसा येथे महाकाली यात्रेकरूंना आश्रय दिला आहे.
चंद्रपुरातील महाकाली यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे राज्य व राज्याबाहेरील लाखो भाविक माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाले आहे. या भाविकांच्या राहण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांचे मित्र डेकोरेशन व्यावसायिक अब्दुल कादर यांच्या वतीने कोहिनूर तलाव येथे पेंडाल टाकण्यात आले होते. मात्र काल रात्रो झालेल्या वादळी वा-यामुळे पेंटाल कोसळला. त्यामुळे शेकडो यात्रेकरुंसमोर निवा-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात येताच त्यांनी अब्दुल कादर यांच्या सहकार्याने याच परिसरात असलेल्या जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट च्या पदाधिकार्यांशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत शेरेतुल इस्लाम मदरसा येथे यात्रेकरुंना आश्रय देण्याची विनंती केली. मदरसा कमेटीनेही यावर तात्कार होकार देत मदरसेची दारे यात्रेकरुंसाठी खुली केली.


त्यामुळे माता महाकालीच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांच्या येथे निवा-याची सोय झाली आहे. मदरसा कमेटी सदर भाविकांना सोयी सुविधा पुरवत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देशाला देत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही जामा मस्जिद पब्लिक ट्रस्ट ने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहे. सोबतच मंदिर परिसरातील मंगल कार्यालये आणि सभागृह यात्रेकरुंसाठी मोकळे करुन तेथे यात्रेकरुंच्या निवासाची सोय करण्याच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना केल्या आहे. या पूर्वी चंद्रपुरात आलेल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी किदवाई हायस्कूल खुली करण्याच्या विनंतीचा किदवाई कमेटीच्या वतीने सन्मान करत पूरग्रस्तांसाठी शाळा खुली केली होती. मुस्लीम समाज नेहमी संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करतो असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.