आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️आलेवाही ते कच्चेपार रस्त्याची दुरावस्था !!▪️ आमदार खासदारबिनकामाचे..

धनराज सरपाते: सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही:( इंडिया २४ न्युज) दिनांक २४/४/२०२४
आलेवाही ते कच्चेपार हे पाच किलोमीटरचे अंतर असून येथे ये_ जा करण्यासाठी कच्चा रस्ता आहे,आलेवाही हे रेल्वे स्टेशन व पोष्ट ऑफिस चे ठिकाण आहे,वाढोणा येथे आरोग्य केंद्र,जिवनापूर येथे सहकारी संस्था, डोंगरगाव येथे तलाठी कार्यालय व आरोग्य उपकेंद्र व पळसगाव येथे बँकेच्या कामानिमित्य याच रस्त्याने जाणे येणे करावे लागते, उन्हाळ्यात धान्य विक्रीसाठी व इतर वाहतूक करण्यासाठी या रस्त्याने बरीच वाहने चालतात, परंतु उन्हाळ्यात थोड जरी पाऊस पडला तरी या रस्त्यावर वाहतूक करणे शक्य नाही, दिनांक १४/४/२०२४ रोजी अल्पशा पावसाची सर आली तरी रस्त्यावर वाहन फसले होते, पावसाळ्यात तर सायकलने सुध्दा प्रवास करणे कठीण आहे, आलेवाही येथे पोष्ट ऑफिस असून यामध्ये किटाळी, नवेगाव,बोदरा, कच्चेपार या गावाचा समावेश आहे, पळसगाव बँकेने या गावाला दत्तक घेतले आहे, डोंगरगाव येथील तलाठी कार्यालय व आरोग्य उपकेंद्रात गावे मोडतात, लोकांना आपले काम करण्यासाठी पाच किलोमीटर अंतराचा रस्ता सोडुन सिंदेवाही वरुन तिस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, पावसाळ्यात शेतीचे कामे असतात यामध्ये हकनाक बळीराजाचे वेळ वाया जातो, याकडे कोणत्याही आमदार/ खासदार नेते मंडळींनी लक्ष वेधून रस्त्याचे काम केलेले नाही, निवडणुका जाहीर झाल्या की, कोणत्याही पक्षाचे नेते मंडळीं कोणत्याही कामाचे आश्वासन देत असतात, एकमेकांवर टीका सुध्दा करतात,कि या पक्षाचे नेते काम करीत नाही, त्या पक्षाचे नेते काम करीत नाही, परंतु आपल्या पक्षाचे उमेदवार जेव्हा निवडणुकीत विजय संपादन करतात तेव्हा आपणही कामे करीत नाही,निवडून येणारे नेते मंडळीं एकाच माळेचे मणी असतात, आजपर्यंत ब्रम्हपुरी क्षेत्रामध्ये अपक्ष, काँग्रेस पक्ष व भाजपा यांचे आमदार/खासदार/ मंत्री होऊन गेले, परंतु जनतेसाठी काहीही विकासाची कामे केली नाहीत, सामाजिक दृष्टीने भरीव असे काहीही कार्ये केल्याचे दिसून येत नाही,सिंदेवाही भुज मार्गे ते ब्रम्हपुरी या मार्गाने कितीतरी वेळा आमदार/ खासदार गेलेले आहेत, त्यांना कधी आलेवाही रस्त्याची आठवण झाली नाही, या क्षेत्रातील प्रत्येक आमदार/ खासदार यांना या रस्त्याबाबत माहिती दिली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून,त्यांचा काम करण्याचा मनसुबा दिसत नाही, या नेते मंडळींकडे पाहीले की गोरे लोकाची आठवण येते,या नेते मंडळींपेक्षा ते गोरे लोक बरे असे वाटते,पुर्वी वाघ, बिबट्याची शिकार करण्यासाठी, गोरे लोक आलेवाही रस्त्याने आपली जिप घेऊन येत होते,ते आपल्या देशातही गेले, तेव्हापासून एवढे दिवस लोटून सुध्दा येथील आमदार/खासदार या रस्त्याचे काम केले नाही, जास्तीत जास्त हल्लीचे आमदार/ खासदार/मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये गुंतल्याचे ऐकायला मिळते, त्यांच्या जवळील संपत्ती पेक्षाही त्यांनी कितीतरी पटीने अधिक संपत्ती जमा केलेली असल्याने, त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढे धन त्यांचे जवळ आहे, लोक टिव्ही वर बघतात, केवळ काही नेते मंडळींवरच चौकशी केली जात आहे,तसे न करता,ते कोणत्याही पक्षाचे नेते असोत, देशातील सर्व नेते मंडळींची पाच वर्षांतून एकदा चौकशी करणे आवश्यक आहे, तेव्हाच त्यांचेवर वचक बसेल, आणि कोण कोण भ्रष्टाचार केलेत त्यांचे जनतेसमोर पितळ उघडे पडेल असे काही सुजाण नागरिकांचे मत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.