ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे लोकसभा मतदारसंघात मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी : जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दिनांक 24 एप्रिल, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून 16 मार्च, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार, 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुका खुला, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपुर्वीच्या 48 तासांमध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुक्यांचा समावेश आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाला लागुन साक्री व शिरपुर तालुका आहे. याकरिता धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे व शिंदखेडा तालुक्याचे सीमेला लागुन असलेल्या शिरपूर व साक्री तालुक्यातील 5 किलोमीटर अंतरात असलेल्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या तसेच धुळे लोकसभा मतदासंघातील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्याार मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपुर्वीच्या 48 तासामध्ये तसेच मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवाव्यात.

▪️असे असेल अनुज्ञप्ती बंदचे क्षेत्र..

धुळे लोकसभा मतदारसंघात सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार असून धुळे लोकसभा मतदारसंघ (धुळे तालुका व शिंदखेडा तालुका) धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सीमेपासून लागुन असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री व शिरपूर तालुक्यातील 5 किलोमीटर अंतर तसेच साक्री तालुक्याला लागुन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या सीमेपासून साक्री तालुक्यातील 5 किलोमीटर अंतरावर शनिवार, 18 मे 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून पुढे, रविवार 19 मे 2024 रोजी पूर्ण दिवस तर 20 मे 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच मतमोजणीच्या दिवशी मंगळवार, 4 जून 2024 रोजी संपुर्ण धुळे जिल्ह्यात संपूर्ण दिवस संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही श्री. गोयल यांनी आदेशात नमूद केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.