ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️‘वोट कर धुळेकर’ स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी..▪️धुळे शहरात मंगळवारी महारॅलीचे आयोजन..

▪️नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दिनांक 27 एप्रिल, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे शहरात मंगळवार, 30 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता शिवतीर्थ, संतोषी माता चौक, धुळे येथून मतदार जनजागृती निमित्ताने महारॅली काढली जाणार आहे. या महारॅलीत धुळेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून धुळे शहरात 30 एप्रिल, 2024 रोजी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगर पालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनामार्फत चार पथकामार्फत महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात महानगरपालिका व पोलीस विभागाच्या पहिल्या पथकामार्फत सकाळी 6.30 वाजता जुनी महानगर पालिका इमारत येथून रॅलीची सुरुवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे ही रॅली शिवतीर्थ येथे 7.00 वाजता येईल.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुस-या पथकामार्फत सकाळी 6.30 वाजता गणपती मंदिर येथुन रॅलीची सुरुवात होऊन ही रॅली शिवतीर्थावर 7.00 वाजता येईल. महसुल व सहकार विभागाच्या पथकामार्फत सकाळी 6.30 वाजता लेलिन चौक येथून तिस-या रॅलीची सुरुवात होवून ही रॅली शिवतीर्थावर 7.00 वाजता येईल. तसेच जिल्हा परिषदेच्या चौथ्या पथकामार्फत सकाळी 6.30 वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे, साक्री रोड येथून बाईक व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली शिवतीर्थावर 7.00 वाजता येणार आहेत.

त्यानंतर चारही पथक शिवतीर्थ, संतोषा माता चौक येथे आल्यावर सकाळी 7.00 वाजता शिवतीर्थ ते गरुड मैदान दरम्यान महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गरुड मैदान येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी पथनाट्य, अहिराणी मतदान जनजागृती, मतदानाची शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीत ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यम प्रतिनिधी, तृतीयपंथी मतदार, योगा क्लब, सायकलींग क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, वारकरी संप्रदाय, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, हौसिंग सोसायटी, जिल्हा व सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

ही महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केले असून जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांनी या महारॅली व मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगर पालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी संयुक्तपणे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.