ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक – जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे, दि. 24 ( इंडिया 24 न्यूज ) : निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून ही प्रक्रिया नीट समजावून घेणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहेत.

०२-धुळे लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया दि.२० मे रोजी शांततामय व निर्भय वातावरणात पार पडली असून या निवडणुकीत एकूण 60.21 टक्के मतदान झाले आहेत.

दरम्यान मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने वोटर टर्नआऊट (Voter turnout) ॲप तयार केलेले आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी ७ नंतर दर दोन तासांनी मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. दि. २० मे रोजी जाहिर करण्यात आलेली मतदानाची आकडेवारी ११,३१,५८० (५५.९६ टक्के) ही सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजित आकडेवारी होती. मतदानाची ही आकडेवारी दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने असुन ती अंदाजित स्वरुपाची होती. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी क्लोज ऑफ पोल (close of poll) म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते. दि. २१ मे रोजी रात्री ९ वाजता जाहिर करण्यात आलेली मतदानाची आकडेवारी १२,१७,५२३ (६०.२१ टक्के) आहे. ही मतदानाची आकडेवारी ही केंद्राध्यक्षांची डायरी आणि नमुना १७ – सी यावरुन खात्री करुन संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवलेली आहे. ही आकडेवारी लोकसभा मतदार संघस्तरावरील नियुक्त पथकाने पडताळणी केल्यानंतर जाहिर करण्यात आलेली आहे व ती अंतिम आकडेवारी आहे. त्याला एंड ऑफ पोल (End of poll) टक्केवारी म्हणतात. याबाबत दि. १९ मे, रोजी पत्रकार परिषद घेण्यात आलेली असुन, त्यात मतदानाची टक्केवारी संकलीत करण्याची प्रक्रिया सविस्तपणे स्पष्ट करण्यात आली आहे.

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल यावर चर्चा करताना प्रत्येकाने ही प्रक्रिया नीट समजून घेणे आवश्यक आहेत. अन्यथा गैरसमज होवू शकतो. तरी नागरिकांनी सोशल मिडीया व इतर प्रसार माध्यमांवर प्रसारीत होणाऱ्या चुकीच्या पोस्ट अथवा माहितीस बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.