आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अकोले करानो जागे व्हा! प्रीपेड मीटर ला विरोध करा..!!

▪️समाजसेवक गजानन हरणे यांचे जाहीर आव्हान..!!

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : अकोला शहरात व जिल्ह्यात जुने मीटर काढून नवीन प्रीपेड मीटर लावण्याचे निश्चित झाले असून निवडणुकीच्या निकालाचा पोया फुटल्यानंतर लगेच या मीटर लावण्याचा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तरी अकोला शहरातील व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी संघटित होऊन आमची लूट करणाऱ्या या प्रीपेड मीटरला विरोध करण्याकरता संघटित होऊन संघर्ष करण्याकरता पुढे येण्याचे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन यांनी जागृत नागरिकांना ,सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था ,संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
सविस्तर वृत्तांत असा की महाराष्ट्राच्या 70 टक्के विज विदर्भात तयार होते. त्यासाठी जमीन पाणी कोळसा ही संपत्ती विदर्भाची लागली वरून वीज प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाने विदर्भाच्या जनतेला कॅन्सर, दमा, टीबी सारखे जीव घेणे दुर्धर आजार मिळाले आहे. तरीही अनेक ठिकाणी नवीन वीज प्रकल्प विदर्भातील अनेक जिल्ह्यात होत आहेत. 24 तास विज मुंबई पुणे गोव्याला विदर्भातील शेतकऱ्यांना ग्राहकांना दहा-बारा तासाची लोड सेटिंग वरून महाग विज बिल विदर्भातील नागरिकांना दिली जात आहे. सरासरी दोन रुपये पन्नास पैशाने तयार होणारी वीज वापरण्याकरता विदर्भातील जनतेला शंभर युनिट पर्यंत सात रुपये 41 पैसे तर 300 युनिट पर्यंत व नंतर 14 रुपये 60 पैसे पाचशे युनिट पर्यंत पंचवीस रुपये 59 पैसे मोजावे लागत आहेत. महावितरण ने 67 644 कोटीची तूट भरून काढण्याकरीता 37 टक्के वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल 2023 पासून एक एप्रिल 2024 पर्यंत 23 टक्के वीज दर वाढ करण्यात आली आहे. उर्वरित चौदा टक्के दरवाढ केव्हाही लागू होऊ शकते. दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले असतानाच अकोला शहरात दुसरा टप्प्यात ग्रामीण भागात प्रीपेड मीटर लावले जाणार आहेत. प्रीपेड मीटरने जनतेची बेसूमार लूट होणार आहे. अगोदर वीज ग्राहकांला विज बिल भरण्याकरता विज बिल निघाल्यापासून चाळीस दिवस दिले जातात. परंतु प्रीपेड मीटर लागल्यानंतर वीज वापरणे अगोदरच वीज ग्राहकाकडून विजेची रक्कम आगाऊ घेतली जाणार आहे. एक प्रीपेड मीटर ची किंमत बारा हजार असून 60 टक्के केंद्र सरकार व 40 टक्के महावितरण वर भार होणार आहे. संपूर्ण मीटरची किंमत वीज ग्राहकाकडून वसूल केली जाणार आहे. प्रीपेड मीटर लावल्याने महावितरण कंपनीतील पस्तीस ते चाळीस हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार सुद्धा हिरावल्या जाणार आहे. मोबाईल समस्या बऱ्याच भागात आहेत. अशा परिस्थितीत रिचार्ज न झाल्याने वीज वापरता येणार नाही. मध्यरात्री वीज संपल्यावर अंधारातच राहावे लागणार आहे. लोड कमी जास्त झाल्याने तांत्रिक खराबिने प्रीपेड मीटर नादुरुस्त झाल्यास किंवा जळाल्यास त्याची किंमत वीज ग्राहका जवळून पुन्हा वसूल केली जाणार आहे. मीटर खराब झाल्यास एवरेज विज बिल येणार नाही. त्यामुळे वाढीव वीज बिल मिळणार. सोबतच सायबर क्राईमचा धोका प्रत्येक वेळेला राहणार केव्हाही रिचार्जचे पैसे आपल्या खात्यातून कटू शकतात. आम्हीही ही लुट सहन करणार काय? या लुटीच्या विरोधात अकोलेकरांनो संघटित व्हा! संघर्ष करण्याकरता रस्त्यावर या त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही. जागे व्हा !अकोले करांनो जागे व्हा!! विरोध करा! विरोध करा! प्रीपेड मिटर लागू देऊ नका. प्रीपेड मीटरचा ताकदीने विरोध करा असे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.