आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

!! वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी!!

 

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही (इंडिया २४ न्युज) दिनांक २६/५/२०२४
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कारगाटा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक २५७ मध्ये वाघाने इसमाला ठार केले, सविस्तर वृत्त असे की , श्री प्रभाकर वेटे वय ४७ वर्षे राहणार डोंगरगाव , हा आज दिनांक २६/५/२०२४ रोजी सकाळी तेंदूपाने संकलन करण्यासाठी लोकांसोबत जंगलात गेला, घराकडे परतत असताना, त्याला तेंदुचे झाड दिसले तेव्हा त्यांनी सोबत असलेल्यांना तेंदूपाने गोळा करून आणतोय म्हणून गेला. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून प्रभाकरला ठार केले, घटनेची माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर,गडपायले व त्यांची चमू तसेच पोलीस निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक महल्ले व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले,प्रेताचा पंचनामा करून, शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले, या पुर्वी याच परिसरात एक घटना घडली होती, त्यामुळे या परिसरातील कच्चेपार, डोंगरगाव,कारगाटा, वासीयाना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.