आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️शिंदखेडा पोलिसांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या 09 गोवंशांचे प्राण..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

शिंदखेडा – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 17 बकरी ईद सणाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे धुळे जिल्ह्यात शांतता अबाधित राहण्याकरिता नाक्यांवर स्थिर पथक नेमण्यात आले होते, तसेच जिल्ह्यात सतर्क गस्त करण्याकरिता आदेशित केले होते. त्यानुसार शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारे कर्मचारी पोलीस हवालदार 1358 प्रशांत पवार व पोलीस शिपाई 1689 विशाल सोनवणे हे काल दिनांक 16 रोजी पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग कामी रवाना झाले होते त्यादरम्यान बोलेरो वाहन क्रमांक MH 15 GV 8719 दोंडाईचा रोडवर दोंडाईचा कडून सोनगीर कडे संशयितरित्या भरधाव वेगाने गेल्याने त्या वाहनास पोलीस हवालदार 1358 प्रशांत पवार आणि पोलीस शिपाई 1689 विशाल सोनवणे यांनी अटकाव करून चालक शेख जमील शेख कलीम राहणार मालेगाव याला विचारपूस केली.

असता त्याने उडवा उडवी चे उत्तर दिलेत त्यानंतर वाहनाची बारकाईने निरीक्षण केले. त्यात वाहनाच्या आजूबाजूला भाजीपाल्याचे कॅरेट लावून आतील भागात एकूण 09 गोवंश जनावरे कोंबलेले अवस्थेत निदर्शनास आले. सदर गोवंश हे कत्तलीसाठी नेण्यात येत होते अशी खात्री झाल्यानंतर लगेचच सदर वाहनास गो शाळेत नेऊन जनावरांची सुटका करण्यात आली. शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी माननीय दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.