ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे जिल्हा न्यायालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

▪️निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे, दिनांक 21 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बदलत्या व वेगवान जीवनशैलीत शारीरिक व मानसिक ताणतणाव हा जीवनाचा एक भाग झाला आहे, म्हणूनच निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले.

जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघाच्यावतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने धुळे जिल्हा न्यायालयात आयोजित योग शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी तसेच धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील आदि उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद पुढे म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे न्यायाधीश वर्ग, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार व त्यांच्या सोबतचे सर्वच देखील मानसिक ताणतणावात असतात, त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर देखील होत असतो. परंतु नियमित व्यायाम व योगासने केल्यास एक प्रकारची ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने योगा करणे आवश्यक आहे.

वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील म्हणाले, आजच्या धकाधकीच्या युगात शारीरिक आरोग्य व मानसिक आरोग्य राखणे हेच एक मोठे आव्हान असून शासनस्तरावर योगासनास प्रोत्साहन दिले जात आहे, त्यासाठी न्यायालयात एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात नियमितता असणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यायालय प्रशासन व वकील संघाच्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी योगगुरु राजेश सोनवणे यांनी प्रार्थना, प्राणायाम यासोबत विविध योगासने यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, पृष्ठासन, त्रिकोणासन, भ्रदासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मकारासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, शवानस इत्यादी आसनाचे प्रकार उपस्थितांकडून करवून घेतले.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, जिल्हा न्यायाधीश श्री. भदगले, जिल्हा न्यायाधीश श्री. अहिर, प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी, सर्व न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाचे पदाधिकारी, वकील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.