ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भरडधान्य नोंदणीसाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 21 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : रब्बी हंगाम 2023-2024 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठीची 20 जून, 2024 पर्यंत मुदत होती. परंतु शेतकरी नोंदणीचा ओघ लक्षात घेता नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी शासनाने 30 जून,2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांला स्वतः नोंदणी साठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी व खरेदीसाठी आपआपल्या तालुक्यातील संबंधीत सहकारी खरेदी विक्री संस्थेशी संपर्क करावा. तरी सर्व शेतकरी बांधवांनी भरडधान्याची नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्री.सोनवणे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.