ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

जगदिश सुरेश कांबळे साहेब यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

आदरणीय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी, श्रमिक कष्टकरी कामगारांना योग्य न्याय हक्क अधिकार मिळावेत म्हणून स्थापन केलेली एकमेव अशी कामगार संघटना, म्हणजे ‘वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य’
या नोंदणीकृत युनियन मध्ये, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने


सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून, उच्च शिक्षित असणारे मा. जगदिश सुरेश कांबळे यांची निवड, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी मा. सुरेश मोहिते साहेब आणि मुंबई राज्य सचिव मा. सुनील लोखंडे साहेब, मा. वेदान्त जाधव रायगड जिल्हा निरीक्षक यांच्या हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर. मुंबई येथे निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, यांच्या बरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
त्यांची झालेली योग्य निवड बद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.