ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
संपादक सौ. शिल्पा बनपुरकर
धुळे, दिनांक 26 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 24 जून, 2024 ते 8 जुलै, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असेही श्री. गोयल यांनी आदेशात नमूद करण्यात आले आहे.