आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बहुजन जनता दल राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त संवाद अभिवादन रॅलीचा कोल्हापूर येथे समारोह संपन्न..

▪️एकात्मतेचा व सामाजिक न्याय समतेचा विचार मराठा.बहुजन समाजाने पुढे न्यावा, पंडितभाऊ दाभाडे

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

कोल्हापूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. बहुजनांना शिक्षण जातिभेद निर्मूलन सामाजिक न्याय एकात्मकाचे व आरक्षणाचे जनक दिन दलितांचे मागासवांचीत बहुजन समाजाच्या आणि महिलांच्या लोकशाहीवादी आणि समाज परिवर्तनवादी व लोक कल्याणकारी थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज शिक्षक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या एकात्मतेचा व सामाजिक न्याय समतेचा विचार मराठा बहुजन समाजाने असे आव्हान बहुजन जनता दल राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले
बुधवार दि.२६ जुन २०२४ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त कोणते कोल्हापूर संवाद रॅलीचे बहुजन जनता दल पुणे शहर व जिल्हा शाखेच्या वतीने बहुजन जनता दल राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते कोल्हापुर येथील दसरा चौक येथे बहुजन जनता दलाच्या संवाद अभिवादन रॅलीचा समारोह कोल्हापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज आणि युवराज छत्रपती मालोजी राजे .संदेश आंबेडकर.(डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू) राजाराम फुले (महात्मा ज्योतिबा फुले यांचे पणतू) श्रीमती सावित्रीबाई साठे (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सुनबाई) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील दसरा चौक येथे समारोह संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी पंडितभाऊ दाभाडे बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलत होते
पुणे रेल्वे स्टेशन चौक येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी पुष्पमाला घालून नतमस्तक होऊन अभिवादन केले सकाळी १० वाजता पुणे ते कोल्हापूर संवाद अभिवादन रॅलीला प्रारंभ केला संवाद अभिवादन रॅली पुणे शहरातील मालधक्का चौक मनपा भवन अलका टॉकीज चौक दांडेकर पूल सिंहगड रोड वडगाव ब्रिज नवले ब्रिज सेवापुर टोल नाका सातारा कराड पेठ या मार्गात कोल्हापूर येथील तारा राणी चौक रेल्वे स्टेशन बस स्थानक गगनबावडा रोड छत्रपती शाहू महाराज (राजवाडा न्यू पॅलेस )भवानी माता मंडप चौक मनपा कोल्हापूर चौक दसरा चौक कोल्हापूर येथे सायंकाळी ४ वाजता बहुजन जनता दल संवाद अभिवादन रॅली दाखल झाली असून याच ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला
यावेळी बहुजन जनता दल कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अॕड. राजाराम काळे शहराध्यक्ष श्याम जाधव शिवाजीराव पाटील सातारा जिल्हाध्यक्ष मंगेशभाऊ मानकर सांगली जिल्हा अध्यक्ष मंगेश बरकडे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष जुवेकर शहराध्यक्ष मनोज कांबळे यांच्या मला आघाडी युवक आघाडी मनपा कर्मचारी आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी सेवा नियुक्त सैनिक आघाडी ऑटो रिक्षा आघाडी यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी कळविले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.